महाशिवरात्रीचा सण हा प्रत्येक शिवभक्तासाठी खूप खास असतो. या दिवशी लोक भगवान शंकराची पूजा करतात. यासोबतच ते आपल्या घरांची साफसफाई आणि सजावटही करतात. घरोघरी वेगवेगळे पदार्थ तयार केले जातात. शिवाय घरसजवण्यासाठी दारासमोर सुंदर रांगोळ्या काढल्या जातात. रांगोळीमुळे सौंदर्य तर वाढतेच पण नकारात्मक ऊर्जाही दूर होते. हिंदू धर्मात कोणत्याही शुभ प्रसंगी दारासमोर रांगोळी काढण्याची पद्धत आहे. यंदा महाशिवरात्री 26 फेब्रुवारी रोजी असून या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीचा विवाह झाला होता.
...