भारतीय अब्जाधीश अनेकदा त्यांच्या अफाट जीवनशैलीमुळे चर्चेत असतात. ज्यात लक्झरी कार, आलिशान इस्टेट आणि प्रायव्हेट जेटचा समावेश असतो. देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये मुकेश अंबानी, अनिल अग्रवाल, राधाकिशन दमानी आणि अदार पूनावाला ही नावे त्यांच्या प्रभावशाली संपत्ती आणि ऐश्वर्यामुळे चर्चेत आहेत. नुकतीच तब्बल २२ कोटी रुपये किमतीची कस्टम बिल्ट रोल्स रॉयस कार विकत घेऊन पूनावाला यांनी अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे.
...