आलिंगन, मिठी हि प्रेमातली सर्वात सुंदर भावना आहे. मिठी मारणे हा आपुलकीचा एक भाग आहे. 12 फेब्रुवारी रोजी साजरा केला जाणारा हग डे हा व्हॅलेंटाइन वीकमधील सर्वात प्रतिक्षित दिवसांपैकी एक आहे. हा दिवस साजरा करण्यासाठी अनेक जोडपे उत्सुक असतात. हा दिवस प्रेम करणाऱ्या प्रत्येकासाठी खूप खास असतो. हग डे च्या निमित्ताने एकमेकांच्या जवळ येणे, एकमेकांचा उबदार स्पर्श अनुभवणे हि भावना प्रत्येक जोडप्यासाठी खूप खास आहे. व्हॅलेंटाईन वीकच्या 12 फेब्रुवारी रोजी हग डे साजरा केला जातो.
...