गुरू आपल्याला केवळ ज्ञान आणि प्रेरणा देत नाहीत तर अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे जाणारा मार्ग दाखवतात. गुरू आपल्याला जीवनाचा योग्य मार्ग दाखवतात, म्हणून त्यांच्याबद्दल प्रेम आणि आदर व्यक्त करण्यासाठी, आषाढ महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी गुरु पौर्णिमा हा सण साजरा केला जातो. गुरुपौर्णिमेला व्यास पौर्णिमा आणि वेद पौर्णिमा असेही म्हणतात.
...