टाटा समूहाचे माजी अध्यक्ष आणि पद्मविभूषण रतन टाटा यांचे 9 ऑक्टोबर 2024 रोजी निधन झाले आहे. रतन टाटा यांच्या निधनानंतर त्यांच्या संपत्तीचे काय होणार असा प्रश्न अनेकांना पडला होता. दरम्यान, रतन टाटा यांनी निधनापूर्वी एक-दोन कोटी नव्हे, तर ५०० कोटी रुपये एका व्यक्तीच्या नावे केले आहे. याचा खुलासा आता झाला आहे. दिवंगत उद्योगपती रतन टाटा यांच्या मालमत्तेबाबत नुकत्याच उघडण्यात आलेल्या इच्छापत्रानुसार त्यांनी आपल्या उर्वरित मालमत्तेचा एक तृतीयांश भाग त्यांचे निकटवर्तीय मोहिनी मोहन दत्ता (वय ७४) यांना दिला आहे.
...