कर्नाटकात ह्युमन मेटान्यूमोव्हायरसचे (एचएमपीव्ही) तीन रुग्ण आढळल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. चीनमध्ये सध्या ह्युमन मेटान्यूमोव्हायरस (एचएमपीव्ही) प्रकरणांमध्ये वाढ होत असून, हा विषाणू अनेक प्रदेशांमध्ये वेगाने पसरत आहे. दरम्यान एचएमपीव्ही म्हणजे काय, त्याची लक्षणे, उपचार आणि तो कसा पसरतो हे जाणून घेऊया. अमेरिकेच्या रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राने (सीडीसी) 2001 मध्ये पहिल्यांदा ओळखलेला एचएमपीव्ही हा नवीन शोधला गेलेला विषाणू नाही.
...