मध्य प्रदेशातील अठरा वर्षीय ललित पाटीदार याला चेहऱ्यावर सर्वाधिक केस असल्यामुळे त्याची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे. हायपरट्रायकोसिस नावाच्या दुर्मिळ अनुवांशिक आजाराने ग्रस्त असलेल्या या किशोरवयीन मुलास झालेल्या या आजारास 'वेअरवुल्फ सिंड्रोम' असे म्हंटले आहे, ज्यामुळे तो त्याच्या अनोख्या दिसण्यासाठी ओळखला जातो. वेअरवुल्फ सिंड्रोम हा एक दुर्मिळ डिसऑर्डर आहे ज्यामुळे शरीरावर केसांची अधिक वाढ होते.
...