उत्तर प्रदेशातील हापुडमध्ये नदीत आत्महत्या करण्यासाठी आलेल्या तरुणीचा जीव वाचवण्यात आला आहे. एक तरुणी पुलावरून उडी मारत असल्याचे पाहिल्यानंतर अनेक जण तिला वाचवण्यासाठी घटना स्थळी जमले होते. यावेळी लोकांनी तिला पाहिलं आणि तिला असं करण्यापासून रोखलं. हापुडमधील गडमुक्तेश्वर या तीर्थनगरीतील ब्रिजघाट येथे ही घटना घडली आहे. ती उडी मारण्याआधीच लोकांनी तिचा जीव वाचवला. यावेळी एका तरुणाने त्याला धरून ठेवले.
...