उत्तर प्रदेशमध्ये महिलांच्या सुरक्षेचा विचार करून, राज्य महिला आयोगाने महत्त्वपूर्ण मार्गदर्शक तत्त्वे प्रस्तावित केली आहेत, ज्यानुसार पुरुष टेलर यापुढे महिलांच्या कपड्यांचे मोजमाप करू शकणार नाहीत. मार्गदर्शक तत्त्वांनुसार, पुरुष शिंप्यांना महिलांच्या कपड्यांचे मोजमाप घेण्यास मनाई आहे. यासोबतच महिला आयोगाने जिम आणि योग केंद्रांसाठी नवीन व्यवस्था लागू करण्यास सांगितले आहे. ज्या अंतर्गत आता महिलांच्या जिम आणि योगा सेंटरमध्ये फक्त महिला प्रशिक्षकांची नियुक्ती केली जाणार आहे.
...