पत्नीच्या संमतीशिवायही पुरुषाने पत्नीसोबत केलेले अनैसर्गिक कृत्य हा गुन्हा मानला जाऊ शकत नाही, असा निकाल छत्तीसगड उच्च न्यायालयाने दिला आहे. उच्च न्यायालयाने सोमवारी एका आदेशात ही टिप्पणी केली आणि आरोपी पतीची भारतीय दंड संहितेच्या कलम ३०४, ३७६ आणि ३७७ अन्वये सर्व आरोपातून निर्दोष मुक्तता केली आणि त्याची तुरुंगातून तात्काळ सुटका करण्याचे आदेश दिले. या प्रकरणी न्यायालयाने गेल्या वर्षी १९ नोव्हेंबर रोजी निकाल राखून ठेवला होता आणि सोमवारी (१० फेब्रुवारी) निकाल दिला होता.
...