मुस्लिम बांधवांसाठी तेलंगणा सरकारने एक विशेष आदेश जारी केला आहे. मुस्लीम बांधवांना रमजान महिन्यात प्रार्थनासाठी वेळ मिळावा म्हणून या निर्णयामुळे 2 मार्च ते 31 मार्च 2025 पर्यंत दुपारी 4:00 वाजता कार्यालये, शाळा आणि इतर सरकारी संस्था कर्मचाऱ्यांना घरी जाण्याची परवानगी देण्यात आली आहे, जेणेकरून पवित्र महिन्यात प्रार्थनेसाठी वेळ मिळेल. तथापि, आदेशात असे नमूद केले आहे की, सेवेच्या अत्यावश्यकतेमुळे त्यांची उपस्थिती आवश्यक असल्यास ही सवलत लागू होणार नाही.
...