महाकुंभमेळ्यादरम्यान भाविकांची गर्दी होत असल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने प्रयागराजला गर्दी पाहायला मिळत आहे. अमृतस्नानानंतर गर्दी कमी होईल असे वाटत होते. मात्र, नेमकं याच्या उलट दिसत असून संपूर्ण महाकुंभमेळ्यादरम्यान वाहनांची गर्दी पूर्वीपेक्षा आता लक्षणीय वाढली आहे. प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या कुंभमेळ्यात भाविकांची मोठी गर्दी होत असल्याने शहरातील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे.
...