या भेटीमुळे भारत आणि कुवेतमधील बहुआयामी संबंध अधिक दृढ करण्याची संधी मिळेल, असे एमईएच्या निवेदनात म्हटलं आहे. या महिन्याच्या सुरुवातीला पंतप्रधान मोदींनी कुवेतचे परराष्ट्र मंत्री एच.ई. अब्दुल्ला अली अल-याह्या यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी व्यापार, गुंतवणूक, ऊर्जा, तंत्रज्ञान, संस्कृती आणि लोकांशी मजबूत संबंधांमध्ये सहकार्य वाढवण्याच्या उपायांवर चर्चा केली होती.
...