उत्तर प्रदेशातील पीलीभीतमधील काशी राम माया राज या खासगी रुग्णालयात प्रसूती दरम्यान नवजात बाळाचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी केलेल्या चौकशीत असे समोर आले आहे कि, भूलतज्ज्ञ उपलब्ध नसल्यामुळे सिझेरियन शस्त्रक्रियेकडे दुर्लक्ष केले आणि त्याऐवजी नॉर्मल डिलिव्हरीचा पर्याय निवडला. प्रसूतीवेदना झाल्यानंतर पतीने पत्नीला दुसऱ्या रुग्णालयात नेण्याची विनंती केली, तेव्हा वैद्यकीय कर्मचार् यांनी नॉर्मल डिलिव्हरी सुरक्षित राहील, असे आश्वासन दिले, ज्याला कुमार यांनी होकार दिला.
...