⚡गुजरातमधील गीर सोमनाथमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; तर दुसरा गंभीर जखमी
By Bhakti Aghav
बिबट्याच्या हल्ल्यात एका 44 वर्षीय पुरूषाचा मृत्यू झाला. तसेच आणखी एक जण गंभीर जखमी झाला. वन विभागाच्या अधिकाऱ्याने रविवारी या घटनेची माहिती दिली. घटनेनंतर, बिबट्या घटनास्थळावरून पळून गेला. जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.