सुलताना बेगम सध्या पश्चिम बंगालमधील हावडा येथील एका छोट्या घरात राहते. तिने याचिकेत म्हटले होते की, भारत सरकारने 1960 मध्ये तिचे पती मिर्झा मोहम्मद बेदर बख्तला बहादूर शाह जफरचा वारस म्हणून मान्यता दिली होती. त्यानंतर 1980 मध्ये बेदर बख्तच्या निधनानंतर सुलताना बेगमला गृह मंत्रालयाकडून पेन्शन मिळू लागली.
...