केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (पीएम-किसान) सुरू केली आहे, ज्याअंतर्गत सरकार शेतकऱ्यांना वर्षभरात तीन हप्त्यांमध्ये 6,000 रुपये देते. या योजनेंतर्गत आतापर्यंत शासनाने शेतकऱ्यांच्या खात्यात १८ हप्ते जमा केले असून, १९ वा हप्ता लवकरच येणे अपेक्षित आहे. दरम्यान, नवरा-बायको दोघांनाही या योजनेचा लाभ मिळू शकेल का, विशेषत: त्यांच्याकडे एकच शेतजमीन असेल तर त्यांना या योजनेचा लाभ मिळू शकेल का, असे प्रश्न उपस्थित होत आहे.
...