या वक्तव्याबाबत विरोधी पक्षांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे. हे विधान असंवेदनशील आणि महिलांचा अपमान करणारे असल्याचे म्हटले आहे. 22 एप्रिल 2025 रोजी, जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार करून 26 जणांचा बळी घेतला, ज्यात 25 पर्यटक आणि एक स्थानिक व्यक्तीचा समावेश होता.
...