प्रसिद्ध चित्रपट निर्माते इम्तियाज अली आणि त्याचा भाऊ साजिद अली एक नवीन रोमँटिक ड्रामा वेब सीरिज 'ओ साथी रे' घेऊन येत आहेत. ही मालिका एका आघाडीच्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रसारित होईल आणि अर्जुन रामपाल आणि अदिती राव हैदरी मुख्य भूमिकेत आहेत. हे दोन्ही कलाकार पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. 2018 मध्ये 'लैला मजनू'चे दिग्दर्शन करणारे साजिद अली या मालिकेचे दिग्दर्शन करणार आहेत.
...