⚡शाहदरा येथील ई-चार्जिंग स्टेशनला भीषण आग; 2 जणांचा होरपळून मृत्यू, 4 जखमी
By Bhakti Aghav
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी पहाटे ई-चार्जिंग स्टेशनमध्ये आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी रवाना करण्यात आल्या. काही वेळातच आग आटोक्यात आली. या घटनेत दोघांचा मृत्यू झाला, तर चार जण जखमी झाल्याचे वृत्त आहे.