महाकुंभ मेळा लवकरच संपणार आहे. दरम्यान, प्रयागराजमध्ये पवित्र स्नान करण्यासाठी भाविकांची गर्दी कमी होताना दिसत नाही. मिळालेल्या वृत्तांनुसार, आतापर्यंत 42 कोटींहून अधिक भाविकांनी गंगा नदीत स्नान केला आहे. महाकुंभाचे शेवटचे शाही स्नान महाशिवरात्रीला 26 फेब्रुवारी रोजी होणार असून मेळा व्यवस्थापकांच्या मते, महाकुंभमेळा महाशिवरात्रीनंतर ४ दिवसांपर्यंत सुरू राहील. महाकुंभ 2025 चा पवित्र आध्यात्मिक मेळा १४४ वर्षांनी आला आहे.
...