भारतीय निवडणूक आयोगाने आज (29 मार्च) घेतलेल्या पत्रकार परिषदेत कर्नाटक विधानसभा निवडणूक कार्यक्रम (Karnataka Assembly Election 2023 Schedule जाहीर केला. त्यानुसार कर्नाटक राज्यात एकाच टप्प्यात निवडणूक पार पडणार आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यात 10 मे रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडेल. तर 13 मे रोजी मतमोजणी होईल. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार (CEC Rajiv Kumar) यांनी ही माहिती दिली.
...