भारतीय हवामान खात्याने (IMD) देशभरात उष्णतेची लाट (Heat Wave Alert India) आणखी किमान पाच दिवस कायम राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. IMD ने राजस्थान, पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली आणि पश्चिम उत्तर प्रदेशसाठी 'रेड' अलर्ट जारी केला आहे. या काळात नागरिकांना उष्णतेशी संबंधित आजारांचा अधिक धोका संभवू शकतो, असेही या अंदाजात म्हटले आहे.
...