गाझियाबादमध्ये Zomato डिलिव्हरी पार्टनरच्या गुंडगिरीचे प्रकरण समोर आले आहे. नंदग्राम पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गढी गावात राहणाऱ्या आधार चौधरीने झोमॅटोवरून जेवण मागवले होते. डिलिव्हरी पार्टनर निशांत जेवण घेऊन आला तेव्हा ग्राहक फोनवर व्यस्त होता. बराच वेळ वाट पाहिल्याने संतापलेल्या निशांतची आधारशी बाचाबाची झाली. झोमॅटोचा डिलिव्हरी बॉय आणि ग्राहक यांच्यात चांगलाच वाद झाला होता.
...