तस्करीच्या रॅकेटद्वारे सायबर फसवणूक (International Cyber Fraud) कार्यात गुंतवलेल्या 60 भारतीय नागरिकांची सुटका करण्यात आली आहे. या सर्वांना नोकरी, व्यवसाय अथवा भरघोस आर्थिक मोबदला आदी आमिष दाखवत फसवणूक करून कंबोडियात (Cambodia) नेण्यात आले होते. तेथे त्यांच्याकडून विविध प्रकारचे सायबर क्राईम (Cyber Crime) करवून घेतले जात असे.
...