विकी कौशल आणि रश्मिका मंदाना यांचा 'छावा' बॉक्स ऑफिसवर सातत्याने नवे मापदंड रचत आहे. या चित्रपटाने चौथ्या वीकेंडमध्ये एकूण 28.43 कोटींची कमाई केली असून, या कालावधीत सर्वाधिक कमाई करणारा हा दुसरा चित्रपट ठरला आहे. यापूर्वी 'पुष्पा २' (30 कोटी) आणि 'स्त्री २' (25.01 कोटी) या चित्रपटांचा या यादीत समावेश होता. चौथ्या आठवड्यात या चित्रपटाने शुक्रवारी 6.30 कोटी, शनिवारी 13.70 कोटी आणि रविवारी हिंदी व्हर्जनमध्ये 8.43 कोटींची कमाई केली
...