चेन्नईच्या इंजांबक्कम परिसरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे एका 40 वर्षीय शाळेच्या मुख्याध्यापिकेला 22 वर्षीय महिला शिक्षिकेसोबत शारीरिक संबंध ठेवल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. तक्रारीनुसार, मुख्याध्यापिकेने आगामी सहामाही परीक्षांबाबत चर्चा करण्यासाठी शिक्षिकेला घरी बोलावले होते. यावेळी मुख्याध्यापिकेने शिक्षिकेला शीतपेय दिल्याने ती बेशुद्ध झाल्याचा आरोप आहे.
...