भारताच्या चांद्रयान-१ आणि चांद्रयान-२ मोहिमेत चंद्राचा पृष्ठभाग आणि एक्सोस्फीअर यांचा अभ्यास करण्यासाठी पाठविण्यात आल्या होत्या. दरम्यान, चांद्रयान-3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरित्या उतरवण्यात आले होते. आता चांद्रयान-४ मोहिमेसाठी भारत सज्ज झाला आहे. आता भारत पहिल्यांदाच चंद्रावरून नमुने घेऊन येणार आहे. चांद्रयान -4 मोहीम 2027 मध्ये प्रक्षेपित केले जाणार आहे. गगनयान आणि समुद्रयान मोहिमा पुढील वर्षी म्हणजे 2026 मध्ये प्रक्षेपित केल्या जातील, असे विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंह यांनी सांगितले आहे.
...