⚡मुंबईच्या 'मेट्रो वुमन' आता पालिकेच्या कारभारी; अश्विनी भिडे यांची आयुक्तपदी नियुक्ती
By Abdul Kadir
मुंबई महानगरपालिकेच्या 130 वर्षांहून अधिक काळाच्या इतिहासात प्रथमच एका महिला अधिकाऱ्याची आयुक्तपदी वर्णी लागली आहे. ज्येष्ठ आयएएस अधिकारी अश्विनी भिडे यांनी भूषण गगराणी यांच्या निवृत्तीनंतर या महत्त्वाच्या पदाचा कार्यभार स्वीकारला आहे.