शनिवारी रात्री दिल्लीतील शाहदरा येथे रामलीला सुरू असताना प्रभू रामाची भूमिका साकारणाऱ्या कलाकाराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. रामलीला सुरू असताना कलाकाराच्या छातीत अचानक दुखू लागले. त्यामुळे तो छातीवर हात ठेवून स्टेजच्या मागे गेला. तेथून त्याला रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला.
...