उत्तर प्रदेशातील मेरठ भागात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे, शनिवारी झालेल्या पावसामुळे एक निवासी इमारत कोसळली. मेरठ विभागाच्या आयुक्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ढिगाऱ्याखाली ७ ते १० लोक अडकल्याची भीती आहे. इमारत कोसळल्यानंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
...