नदीत बुडून मृत्यू झालेली सर्व मुले एकाच कुटुंबातील असल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातानंतर संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. रविवारी सकाळी कृष्णा गोंड यांची चार मुले आणि त्यांच्या बहिणीच्या मुलीसह सात जण आंघोळीसाठी सोन नदीवर गेले होते. आंघोळ करत असताना अचानक सर्व मुले खोल पाण्यात गेली आणि बुडू लागली.
...