संभलच्या शाही जामा मशिदीसंदर्भातील सर्वेक्षण अहवाल गुरुवारी चंदौसी न्यायालयात सादर करण्यात आला आहे. न्यायालयाचे आयुक्त रमेश राघव यांनी सुरक्षेच्या कारणास्तव दिवाणी न्यायाधीश आदित्य सिंह यांच्या न्यायालयात गुपचूप हा अहवाल सादर केला. या अहवालातून अनेक मोठे खुलासे झाले आहेत. सर्वेक्षणादरम्यान मशिदीत दोन वडाची झाडे आढळून आली आहेत.
...