आनंद महिंद्रा यांनी एक उदाहरण दित सांगितले की, अभियंते आणि एमबीए सारखी पार्श्वभूमी असलेल्या लोकांनी कला आणि संस्कृतीचा अभ्यास केला पाहिजे जेणेकरून ते चांगले निर्णय घेऊ शकतील. कुटुंब आणि मित्रांसोबत वेळ घालवण्याची गरज अधोरेखित करताना महिंद्रा म्हणाले, जर तुम्ही घरी वेळ घालवत नसाल, मित्रांसोबत वेळ घालवत नसाल, जर तुम्ही वाचन करत नसाल, जर तुम्हाला चिंतन करण्यासाठी वेळ मिळत नसेल, तर तुम्ही निर्णय घेताना योग्य इनपूट कसे आणाल?
...