उत्तर प्रदेशातील मेरठमधील सोहेल गार्डन येथील एका घरात एकाच कुटुंबातील पाच जणांची हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी ही माहिती दिली. घटनास्थळी उपस्थित असलेले वरिष्ठ पोलिस अधीक्षक डॉ. विपिन ताडा यांनी सांगितले की, गुरुवारी सायंकाळी पोलिसांना लिसारी गेट पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका घरात एका दाम्पत्याचे आणि त्यांच्या तीन मुलांचे मृतदेह आढळल्याची माहिती मिळाली. त्यांनी सांगितले की, घराचा दरवाजा बाहेरून बंद होता.
...