मणिपूरमध्ये 3 मे रोजी व्यापक जातीय हिंसाचार भडकल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा हा पहिलाच मणिपूर दौरा आहे. याबाबत शाह यांनी ट्विटमध्ये लिहिले, ‘आज इंफाळमध्ये विविध नागरी संस्था संघटनांच्या सदस्यांशी फलदायी चर्चा झाली. त्यांनी शांततेसाठी आपली वचनबद्धता व्यक्त केली आणि आश्वासन दिले की, मणिपूरमध्ये सामान्य स्थिती पूर्ववत करण्यासाठी आम्ही एकत्रितपणे योगदान देऊ.’
...