माघी पौर्णिमेनिमित्त पवित्र स्नान करण्यासाठी प्रयागराज येथील त्रिवेणी संगमावर भाविकांनी चांगलीच गर्दी केल्याचे पाहायला मिळत आहे. या शुभमुहूर्तावर लाखो भाविक गंगेत स्नान करण्यासाठी आले आहेत. माघी पौर्णिमेनिमित्त हेलिकॉप्टरमधून गंगेत स्नान करणाऱ्या भाविकांवर पुष्पवृष्टी केली जात आहे. देशभरात माघ पौर्णिमेचा दिवस भक्तिभावाने साजरा केला जात आहे. भाविक पवित्र नद्यांमध्ये स्नान करत आहेत.
...