महाकुंभ 2025 हा सनातन संस्कृतीचे प्रतिनिधित्व करणारा सर्वात मोठा मेळा आणि मानवतेचा अमूर्त वारसा असल्याने जगभरात कुतूहल निर्माण झाले आहे. जगभरातील लोक विविध संकेतस्थळे आणि पोर्टल्सच्या माध्यमातून सक्रियपणे या भव्य सोहळ्याची माहिती घेत आहेत. https://kumbh.gov.in/ महाकुंभाचे अधिकृत संकेतस्थळ विश्वसनीय माहितीचा प्राथमिक स्त्रोत म्हणून उदयास आले असून, जगभरातील कोट्यवधी वापरकर्त्यांकडून लक्षणीय रहदारी दिसून येत आहे.
...