उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे महाकुंभमेळ्याचा महाशिवरात्रीनिमित्त आणि २६ फेब्रुवारी रोजी कार्यक्रमाचा शेवटचा दिवस असल्याने महाकुंभात सहभागी होण्यासाठी आणि पवित्र स्नान करण्यासाठी भाविक आज प्रयागराजमध्ये दाखल होऊ लागले आहेत. महाकुंभमेळ्याचाच्या शेवटच्या दिवशी भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. भाविकांना विनाअडथळा गंगेत स्नान करता यावे, यासाठी महाशिवरात्री उत्सवाची तयारी मेळा प्रशासनाने पूर्ण केली आहे.
...