प्रयागराजयेथील महाकुंभमेळ्यात लाखो भाविक संगमात स्नान करण्यासाठी दाखल होत आहेत. दरम्यान, उद्योगपती अनिल अंबानी आणि त्यांच्या पत्नी टीना अंबानी यांनीही महाकुंभात हजेरी लावत संगमात स्नान केले. अनिल अंबानी आणि टीना अंबानी यांच्यासह इतरही अनेक नामवंत व्यक्ती या महाकुंभात सहभागी होत आहेत. पौष पौर्णिमेला १३ जानेवारीपासून सुरू झालेला महाकुंभ मेळ्यात अनेक भाविक येत आहेत. आतापर्यंत लाखो भाविकांचे स्वागत करण्यात आले आहे.
...