मध्य प्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यात अल्पवयीन 17 वर्षीय शेजाऱ्याने पाच वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार करून तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने 22 फेब्रुवारी रोजी मुलीला घराच्या गच्चीवर खेळत असतांना जवळच असलेल्या एका निर्जन घरात नेले. तेथे त्याने तिच्यावर दोन तासांहून अधिक काळ लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे.
...