उच्च न्यायालयाच्या स्थगिती आदेशाची मुदत संपल्यानंतर जिल्हा प्रशासनाने १९९९ मध्ये बेकायदेशीर पद्धतीने बांधलेली मशीद पाडण्याचे काम सुरू केले आहे. कडक बंदोबस्तात रविवारी सकाळी १० वाजता बुलडोझरने तीन मजली मदनी मशीद पाडण्यास सुरुवात केली. उत्तर प्रदेशातील कुशीनगर जिल्ह्यातील हाटा नगरपालिका क्षेत्रातील मदनी मशिद शुक्रवारी प्रशासनाने पाडण्यास सुरुवात केली होती. मशिदीचा काही भाग सरकारी जागेवर बेकायदा बांधण्यात आल्याचा प्रशासनाचा दावा आहे
...