झारखंडमधील चार जिल्ह्यांमध्ये पोलिसांनी विशेष कारवाई करत सुमारे सव्वाशे कोटी रुपयांची अफूही शेती उद्ध्वस्त केली आहे. रांची, खूंटी, सरायकेला-खरसावां आणि चाईबासा या ठिकाणी अफूची अवैध शेती सुरु होती. या कारवाईत आतापर्यंत या अवैध धंद्यात गुंतलेल्या 86 जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार आतापर्यंत ट्रॅक्टर आणि गवत कापण्याच्या यंत्राचा वापर करून एकूण 9 हजार 871 एकर अफूची लागवड शोधून नष्ट करण्यात आली आहे. या चार जिल्ह्यांपैकी खुंटी येथे सर्वाधिक प्रमाणात अफूची लागवड नष्ट झाल्याची माहिती समोर आली आहे.
...