देशात ह्युमन मेटान्यूमोव्हायरस (एचएमपीव्ही) विषाणूचा आणखी एक रुग्ण आढळला आहे. आता पुद्दुचेरीमध्ये एका 5 वर्षांच्या मुलीला एचएमपीव्हीची लागण झाली आहे. ताप, खोकला अशी लक्षणे आढळल्यानंतर मुलीची तपासणी केल्यानंतर तिला एचएमपीव्ही झाल्याचे निदान झाले. मात्र, मुलीची प्रकृती सुधारत असून तिला देखरेखीखाली ठेवण्यात आल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले. आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, एचएमपीव्ही हा एक जुना विषाणू आहे, जो पहिल्यांदा 2001 मध्ये ओळखला गेला होता.
...