हिमाचल प्रदेशातील कुल्लू जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. हवामान खात्याने पुढील 24 तास मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे, ज्यामुळे परिस्थिती आणखी बिघडू शकते. कुल्लू, मनाली आणि आजूबाजूच्या भागात दरड कोसळण्याची ही शक्यता आहे. मुसळधार पावसामुळे अनेक नदी नाले ओव्हरफ्लो होऊन वाहू लागले आहेत. पावसामुळे रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे.
...