उत्तर प्रदेशातील वाराणसी जिल्हा न्यायालयात शनिवारी ज्ञानवापी खटल्याची सुनावणी सुरू होती. यावेळी एक अनोखी घटना घडली, ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. सुनावणीदरम्यान एक माकड सीजेएम कोर्टात शिरलं आणि टेबलावर बसले. जवळपास तासभर सुनावणी सुरू होती आणि यावेळी माकड कोर्टरूममध्ये उपस्थित होते. त्याने कोणाचेही नुकसान केले नाही किंवा कोणत्याही कागदपत्राशी किंवा फाईलशी छेडछाड केली नाही.
...