मद्यपी पतीला कंटाळून दोन महिलांनी घर सोडून एकमेकांशी विवाह केला. कविता आणि गुंजा ऊर्फ बबलू यांचा विवाह गुरुवारी सायंकाळी देवरियातील छोटी काशी येथील शिवमंदिरात झाला. इन्स्टाग्रामवर त्यांची पहिली भेट झाली आणि अशाच परिस्थितीमुळे ते एकमेकांच्या जवळ आले, असे तिने पत्रकारांना सांगितले. दोघांनाही मद्यपी पतीकडून घरगुती हिंसाचार सहन करावा लागला. मंदिरात गुंजाने नवरदेवा बनून कविताला सिंदूर लावला आणि तिने सात फेऱ्या पूर्ण केल्या.
...