उत्तर प्रदेशातील इटावा मध्ये आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. सायबर गुन्हेगारांना बळी पडलेल्या प्रशांत कुमार शर्मा (३७) या तरुणाने आत्महत्या केली आहे. हे प्रकरण कोतवाली परिसरातील छाराहा या जुन्या शहरातील आहे. मृताच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत कुमार शर्मा हे २०१४ पासून बडपुरा तालुक्यात आरोग्य विभागात प्रकल्प व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते. मंगळवारी सायंकाळी त्याने घराच्या दुसऱ्या मजल्यावरील बाथरूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली.
...