दिल्लीतील सर्व ७० जागांसाठीचा निकाल आज जाहीर होणार आहे. समोर येत असलेल्या निकालात आम आदमी पक्षाला मोठा धक्का बसला आहे. मतमोजणी दरम्यान भाजपला बहुमत मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोणत्याही फाईल्स कुठे जाऊ नये म्हणून दिल्ली सचिवालय सील करण्यात आले आहे. भाजप सरकार भ्रष्टाचाराविरोधात कठोर कारवाई करण्याच्या तयारीत असून सत्तेत येताच अनियमिततांची चौकशी सुरू करू शकते, असे मानले जात आहे. निवडणूक निकालानंतर राजधानीच्या राजकीय वर्तुळात हालचालींना वेग आला असून आता नव्या सरकारच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
...