छत्तीसगडमधील विजापूर येथे रविवारी केलेल्या नक्षलविरोधी मोहिमेत सुरक्षा दलांनी या वर्षातील आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या नक्षलविरोधी मोहिमेत जवळपास ३१ माओवाद्यांना कंठस्नान घातले. या चकमकीत दोन सुरक्षा रक्षक शहीद झाले, तर दोन जण जखमी झाले. छत्तीसगडमधील विजापूर जिल्ह्यातील राष्ट्रीय उद्यान परिसरातील जंगलात सुरक्षा दलआणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत हे नक्षलवादी ठार करण्यात आले होते.
...